कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत सावरी
अधिकृत संकेतस्थळ
Dr. Babasaheb Ambedkar
Mohandas Karamchand Gandhi

आमच्या गावाबद्दल

मौजा सावरी जवाहरनगर येथे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी सन 1962 मध्ये स्थापन केली आणि त्यातून आपल्या संरक्षण विभागाला दारुगोळा पुरवठा करण्यात येत आहे.

सावरी गावातील एक व्यक्तिमत्व स्व. डॉ चंद्रमोहन गुप्ता यांना, त्यांच्या वैद्यकीय सेवेतील अतुलनीय कामगिरी बद्दल महामहीम राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीची मुख्य उद्दिष्टे:

आमचा मार्गदर्शक दृष्टीकोन आणि प्रयत्न

दृष्टीकोन

ग्रामपंचायत सावरीचा दृष्टीकोन हा स्वच्छ, सुरक्षित, समृद्ध व आत्मनिर्भर गाव निर्माण करण्याचा आहे. आधुनिक सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे हा आमचा मुख्य हेतू आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत गुणवत्तापूर्ण सुधारणा करून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे आणि भावी पिढीसाठी आदर्श गाव घडविणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.

मिशन

मपंचायत सावरीचे मिशन म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, स्वच्छ व सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणे होय. पारदर्शक, लोकाभिमुख व उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत  सावरी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सेवांचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हेच आमच्या सेवांचे प्रमुख ध्येय आहे. खालील सेवा आम्ही सातत्याने प्रदान करतो

पाणीपुरवठा सेवा

ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.

कचरा व्यवस्थापन व स्वच्छता

ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.

शिक्षणविषयक सेवा

ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.

स्मशानभूमी व्यवस्थापन

ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.

अग्निशमन सेवा

ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.

वाढदिवस, विवाह, मृत्यू नोंदणी

ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.

ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य

श्री.गिरीश संतोष ठवकर

सरपंच

श्री. संदीप भीमराव नागदेवे

उपसरपंच

श्री. विनोद जमनाबाई वासुदेव भिमटे

ग्रामपंचायत अधिकारी

गावाची माहिती

ग्रामपंचायत

सावरी

स्थापना

१९८८

क्षेत्रफळ

३०८.६१ हे. आर

तालुका

भंडारा

जिल्हा

भंडारा

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या

८७७०

स्त्री

४३२८

पुरुष

४४४२

कुटुंब संख्या

610

अंगणवाडी

3

जिल्हा शाळा

1

आरोग्य केंद्र

0

पोस्ट ऑफिस

1

तलाठी ऑफिस

1